bhandara  Saam tv
महाराष्ट्र

राज्यात चाललंय काय? घरात भाजी मागण्यासाठी आलेल्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; पीडिता 4 महिन्यांची गरोदर

bhandara crime news : घरात भाजी मागण्यासाठी आलेल्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडिता 4 महिन्यांची गरोदर झाल्याचं उघड झालं आहे.

Saam Tv

लाखनीत ५० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

५० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडिता चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती

शुभम देशमुख, साम टीव्ही

राज्यातील विविध जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस होऊ लागल्या आहेत. पुण्यानंतर आता भंडारा जिल्ह्यातही संतापजनक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यातील लाखनीत ५० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. नराधमाच्या कृत्याने लाखनी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

५० वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवल्याचं उघड झालंय. संतापजनक प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नराधमाच्या कृत्यानंतर त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

जागेश्वर असे आरोपीचे नाव आहे. नराधम हा पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. डिसेंबर २०२५ मध्ये अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी भाजी मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी नराधमाने साधली. त्याने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपीच्या दहशतीमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. आरोपीच्या भीतीमुळे तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.

घटनेला चार महिने उलटले. त्यानंतर पीडित मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागला. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे पालकांनी तिला तातडीने सरकारी रुग्णालयात नेलं. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

मुलीने धीर धरून घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी त्वरित पोलीस ठाणे गाठलं. पीडितेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपीला कठोर कायदेशीर धडा शिकवण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT