Bhandara  अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

पुष्पा फ्लावर नही ''बोकड'' है मैं ! दीडशे किलो आणि साडेपाच फुटांचा पुष्पा...(पहा Video)

भंडारा जिल्ह्यामध्ये तब्बल १५० किलो वजनाचा पुष्पा नामक बोकड आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: भंडारा जिल्ह्यामध्ये तब्बल १५० किलो वजनाचा पुष्पा नामक बोकड आहे. हे ऐकून तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात चांदोरी या गावात तब्बल १५० किलो वजनाचा विशालकाय ५ फूट उंच आणि ५ फूट लांबीचा पुष्पा (Pushpa) नामक बोकड आहे. याची अंगकाठी बघता जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या वजनाचा एकमेव बोकड भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे पुष्पा नामक सिनेमा (Cinema) फेमस झाला. त्याचप्रमाणे भंडाऱ्यातील हा पुष्पा बोकड देखील फेमस झाला आहे.

पहा व्हिडिओ-

यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी एकच झुंबड चांदोरी गावात (village) उडाली आहे. साकोली तालुक्याच्या चांदोरी ग्रामपंचायतचे (Gram Panchayat) सदस्य देवाजी हातझाडे यांच्याकडे २५ महिने वयाचा पुष्पा नामक बोकड आहे. तब्बल १५० किलो वजनाचा. ५ फूट उंच आणि ५ फूट लांबीचा हा बोकड पाहिल्यावर भल्या- भल्यांचा थरकाप उडत आहे. या पुष्पाला बघितल्यावर तो नेमकं खातो तरी काय असा प्रश्न पडणं स्वाभाविक राहणार आहे. तर याला रोज खाण्यासाठी कुडवाभर तांदूळ आणि कुडवाभर गहू लागत आहे. त्याला रोज फिरल्यानंतर मसाज देखील करावं लागतो.

पुष्पा घराबाहेर पडून रस्त्याने चालू लागला तर त्याची अंगकाठी बघून चांगले- चांगले थरथर कापत त्याला वाट मोकळी करुन देत असतात. त्याचा हा रुबाब बघता पुष्पा नामक दाक्षिणात्य चित्रपटातील अल्लू अर्जुनप्रमाणे त्याचा दरारा भंडाऱ्यात बघायला मिळत आहे. आता त्याची चर्चा पंचक्रोशीत पसरली आहे. या पुष्पाला खरेदी करण्यासाठी चांदोरी गावात झुंबड उडाली आहे. आता या पुष्पाचा तोरा बघता त्याच्या मालकाने किंमत २ लाख रुपये ठेवली आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी लावलेली बोली लक्षात घेता मालक देवाजी हातझाडे 'झुकेगा नही साला' म्हणत किंमत सोडायला तयार नाही.

यामुळे लाखोची बोली असलेल्या पुष्पाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात लागू लागली आहे. ५ फूट, लांब पाच फूट उंच असलेल्या भंडारा जिल्ह्यात एकमेव असलेल्या बोकडाला बघण्यासाठी हातझाडे यांच्या घरी बघ्यांची गर्दी दररोज बघायला मिळत आहे. यामुळे एका सेलिब्रेटीप्रमाणे असलेला पुष्पा आता भंडारा जिल्ह्यामध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील दिसायला लागला आहे. संपूर्ण देशात फेमस असलेल्या पुष्पा चित्रपटाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा पुष्पा देखील फेमस झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT