महाराष्ट्र

Bhandara Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमातला अडथळा कायमचा संपवला; प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली भोळ्या पतीची हत्या

Bhandara News: प्रेमाच्या धुंदीत ज्योतीने आपल्याच कुकुंवाला पुसलं. स्वत:च्या हाताने तीने नवऱ्याचा गळा आवळला. ज्योती आपल्या नवऱ्याकडून घटस्पोट घेऊ शकत होती.

Ruchika Jadhav

Bhandara:

ज्याच्याबरोबर साप्तपदी घेऊन संसार थाटला. ज्याच्याबरोबर सात जन्मसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. त्याच नवऱ्याला एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लग्नानंतरही बायकोचं परपुरुषावरचं प्रेम या हत्येला कारणीभूत ठरलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवरा प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने तीने नवऱ्याचा गळा आवळला. पत्नीची क्रूरता इथेच थांबली नाही. तिने पतीच्या देहाला अक्षरश: जंगल शिवारातील गटात फेकून दिलं आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातल्या मडगी येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. 35 वर्षीय ज्योती राऊत आणि तीचा 36 वर्षीय पती विक्की करकाळे यांच्यात प्रेमसंबंध होते. ज्योती विवाहीत होती. मदन राऊतशी तीने संसार थाटला होता. पण नवऱ्याच्या पाठीमागे ज्योतीचे विक्कीशी प्रेमसंबंध होते.

ज्योती आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात धुळ फेकत होती. एकीकडे घर, दार संसार आणि दुसरीकडे सच्चा प्यार. असा डबलगेम ज्योतीने केला. शेवटी नवरा आणि प्रियकर या दोघांमधून ज्योतीने प्रियकराची निवड केली आणि दुसऱ्याला कायमचं संपवून टाकलं.

प्रेमाच्या धुंदीत ज्योतीने आपल्याच कुकुंवाला पुसलं. स्वत:च्या हाताने तीने नवऱ्याचा (Husband) गळा आवळला. ज्योती आपल्या नवऱ्याकडून घटस्पोट घेऊ शकत होती. ती कायदेशीर हे नातं नाकारू शकतं होती, पण तीने वेगळा मार्ग निवडला. नवऱ्याला संपवून ज्योतीने प्रियकराबरोबर नवीन संसार थाटायचा विचार केला असावा. पण तीचे आणि तिच्या प्रियकराचे हात रक्ताने माखलेत याचा त्यांनी विचार केला नसावा. म्हणून लग्नबंधनात अडकण्यापूर्वीच ते कायद्याच्या कचाट्यात अडकले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT