Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News: पत्नीची हत्या करून पती फरार; भंडाऱ्यात सहा दिवसात दुसरी घटना

पत्नीची हत्या करून पती फरार; भंडाऱ्यात सहा दिवसात दुसरी घटना

साम टिव्ही ब्युरो

भंडारा : कुलूप बंद घरात रक्ताच्या थारोळ्यात एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याची घटना भंडाऱ्याच्या (Bhandara) एकलारी गावात घडली. मात्र पती फरार असल्‍याने पतीनेच हत्‍या केल्‍याचा अंदाज पोलिसांनी (Police) वर्तविला आहे. (Live Marathi News)

भंडारा जिल्‍ह्यातील एकलारी गावातील येनुबाई कंठीराम बालपांडे (वय ५५) असे मृत महीलेचे नाव आहे. महिलेच्‍या डोक्‍यात लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याने (Crime News) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह मुलाला आढळून आला. यानंतर पोलिसांनी सदरची माहिती दिली असता पोलिसांचे पथक दाखल झाले. पंचनामा करून पोलिस पुढील तपास करत आहेत. सहा दिवसांपूर्वी रोहा या गावात सासऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून सुनेची हत्या केली होती. सहा दिवसातील एक दुसरी घटना आहे.

पतीचा शोध सुरू

घटनेपासून मृतक विवाहितेचा पती कुठेही आढळून आला नाही. यामुळे पतीनेच कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या केली असावी, असा संशय वरठी पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतक महिलेच्या पतीच्या शोधात रवाना करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

अजित पवार गटात नाराजीनाट्य आहे? कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी थेटच सांगितलं

SCROLL FOR NEXT