Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : भंडारा को- ऑपरेटिव्ह बँकेत चोरीचा प्रयत्न फसला; लॉकर न तुटल्याने रक्कम सुरक्षित

Bhandara Co-Operative Bank : रात्रीच्या वेळी गावात सामसूम झाल्यानंतर चोरट्यानी बँकेतील लॉकर फोडण्याच्या प्लॅन आखला होता.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील डोकेसरांडी येथील डिस्ट्रिक्ट को- ऑपरेटिव्ह बँकेत चोरट्यानी चोरी करण्याच्या इराद्याने आतमध्ये प्रवेश केला होता. मात्र बँकेत प्रवेश करूनही लॉकर न फुटल्याने त्यांचा चोरीचा हा प्रयत्न फसला आहे. यामुळे बँकेतील लॉकरमध्ये असलेली रक्कम सुरक्षित आहे. 

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथे डिस्ट्रिक्ट को- ऑपरेटिव्ह बँक आहे. रात्रीच्या वेळी गावात सामसूम झाल्यानंतर चोरट्यानी बँकेतील लॉकर फोडण्याच्या प्लॅन आखला होता. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास बँकेचा दरवाजा तोडून चोरट्यांनी शिताफिने बँकेच्या आत प्रवेश केला. यानंतर लॉकर तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला.  

बँकेतील लॉकर तोडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र लॉकर फोडण्यात चोरट्याना अपयश आल्याने त्यांचा चोरीचा प्रकार फसला. यामुळे चोरीच्या इराद्याने आलेल्या चोरट्याना रिकाम्या हातानेच परतावे लागले होते. सुदैवाने बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित राहिली आहे. दरम्यान सकाळी बँकेचा दरवाजा उघडा दिसल्याने हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला.

सकाळी बँक उघडी दिसल्याने नागरिकांनी याबाबत बँक अधिकारी व लाखांदूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने बँकेत सर्व तपासणी केली. यात रक्कम सुरक्षित असल्याची माहिती समोर आली. मात्र बँकेत चोरी करणारे चोरटे कोण होते याबाबतर पोलीस पुढील तपास करत असून त्या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT