Bhandara Accident Saam
महाराष्ट्र

Bhandara Accident: देव तारी त्याला कोण मारी! चालताना महिला आली ट्रकच्या चाकाखाली; अन्..., Video व्हायरल

Accident Video : पायी चालणाऱ्या महिला ट्रकच्या चाकाखाली आल्याची घटना भंडारा येथे घडलीय. ट्रकचं मागील चाक महिलेच्या अंगावरून गेल्यानंतरही महिला बचावल्याचे समजल्यानंतर सर्वजण आवाक झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(शुभम देशमुख, भंडारा)

Bhandara Truck Accident Video :

'देव तारी त्याला कोण मारी', अशी म्हण आपण ऐकली असेल, या म्हणीची प्रचिती भंडारा येथील अपघातातून आली. पायी चालणाऱ्या महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याची घटना मालवीय नगर चौकात घडलीय. हा ट्रक सिहोऱ्याकडून तुमसरकडे जाणाऱ्या ट्रकने महिलेला चिरडलं. ट्रकचं मागील चाक महिलेच्या अंगावरून गेलं. परंतु सुदैवाने महिलेला काहीच इजा झालेली नाहीये. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा ट्रक सिहोऱ्याकडून तुमसरकडे येत होत्या. मालवीय चौकात एक महिला पायी चालत होती, त्यावेळी या नव्या ट्रकच्या मागील चाकाखाली ही महिला आली. महिलेच्या अंगावर पूर्ण चाक गेल्यानंतरही महिलेला कोणतीच इजा झालेली नाहीये. सुनिता शैलेंद्र जैन वय (५०) वर्षे रा. बोस. नगर तुमसर असं या महिलेचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अपघाताचा हा व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणारा आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रकची महिलेला धडक झाल्याचं समजल्यानंतर ट्रक चालक वाहन घेऊन तेथून पसार झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला काही कामानिमित्त जात होती. त्यावेळी सिहोऱ्याकडून तुमसरकडे येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडलं. रस्त्यावर तुरळक रहदारी होती. महिलेच्या अंगावरुन ट्रक गेल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना आरडा-ओरडा केला. ट्रकचं मागील चाकाखाली महिला आल्याने महिलेला खूप दुखापत झाली असे,असं अनेकांना वाटलं. पण सुदैवाने या सुनिता जैन यांना कोणतीच दुखापत झाली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT