Bhandara Truck Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Truck Accident : ट्रकची उच्च दाबाच्या विद्युत खांबाला धडक; मोठा अनर्थ टळला

Bhandara News : तुमसर- भंडारा महामार्गावरील खापा येथे आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली ट्रक मागे घेत असताना विद्युत पोल दिसला नाही यामुळे पोलला जोरदार धडक यात खांब खाली पडून विद्युत तारा तुटल्या

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: तुमसर- भंडारा महामार्गावरील खापा येथे रजवी पेट्रोल पंप समोर ट्रकने मागे घेताना विद्युत खांबाला धडक दिली. ट्रकने दिलेल्या धडकेत खांब तुटला. यामुळे खांबावरील चालू विद्युत तार महामार्गावर पडले होते. यावेळी महामार्गावर वाहनांची रहदारी सुरु असल्याने यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र लागलीच वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने अनर्थ टळला आहे. 

तुमसर- भंडारा महामार्गावरील खापा येथे आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. चालकाने ट्रक मागे घेत असताना विद्युत पोल दिसला नाही. यामुळे पोलला जोरदार धडक दिली. यात खांब खाली पडून विद्युत तारा देखील तुटल्या होत्या. हा प्रकार लक्षात येताच लिलाधर वाडीभस्मे यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवून तत्काळ विद्युत विभागाला माहिती दिली. विभागातील कर्मचाऱ्यांनी येऊन विद्युत पुरवठा बंद केला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. 

मोठी दुर्घटना टळली 

दरम्यान सकाळची वेळ असल्याने महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ अधिक असते. दरम्यान हा अपघात घडला यावेळी फारशी रहदारी नसल्याने दुर्घटना टळली आहे. तसेच विद्युत तारा तुटून पाडल्यानंतर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पुरवठा बंद केला. यानंतर रस्त्यावर पडलेले तार रस्त्याच्या कडेला करून व त्या खांबावरून जाणारी विद्युत पुरवठा दुसरीकडून कट करून उर्वरित परिसरातील पुरवठा काही काळाने सुरू करण्यात आली.

कोंडाईबारी घाटात ट्रकचा अपघात

नंदुरबार : तामिळनाडू राज्यातून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या ट्रकचा नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाबारी घाटात अपघात झाला. महामार्गावर ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे महामार्गलगत असलेल्या खड्ड्यात ट्रक गेल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला असून जखमी ट्रक चालक विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT