bribe news, bhandara news, bhandara Latest Marathi News  Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara News : वाळूचा ट्रक साेडण्यासाठी लाच घेतल्याबद्दल चाैघे अटकेत

आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara Crime News : रेती तस्करी प्रकरणात वनविभागाने (forest department) जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना दोन वनरक्षक, वनमजूर आणि एका खासगी व्यक्तीला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

वनरक्षक गणेश महाजन काकरवाल, मनीष उत्तम मेश्राम, वनमजूर केसरी रामासाव उचिबगले आणि खासगी व्यक्ती मो. शहाबुद्दीन मो. दाऊद अन्सारी अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. या चाैघांनी अटक (arrest) करण्यात आली आहे.

तुमसर तालुक्यातील आसलपानी येथील एका व्यक्तीचा ट्रॅक्टर 13 ऑगस्टला वनरक्षक गणेश काकरवाल आणि मनीष मेश्राम यांनी जप्त केला होता. हा ट्रॅक्टर सोडण्यासाठी 25 हजार रुपयाच्या लाचेची मागणी तक्रारदारास करण्यात आली. तक्रारदाराने याबाबत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यावरुन एसीबीनं सापळा रचला असता लेंडेझरी कार्यालयात खासगी व्यक्ती मो. शहाबुद्दीन याने पैसे स्वीकारले. दोन्ही वनरक्षकांनी वनमजुराच्या मध्यस्थीने लाचेची मागणी केल्याचे पुढे आल्यावर चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यावरुन आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT