Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Bhayyaji Joshi: भैय्याजी जोशींचं वक्तव्य देशद्रोह; संजय राऊत संतापले, मुख्यमंत्र्यांकडे केली विशेष मागणी

Sanjay Raut on Bhaiyyaji Joshi Statement: भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण तापलं. जोशींनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतला.

Bhagyashree Kamble

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली होती. 'मुंबईत येणाऱ्यांनी मराठी भाषा शिकलं पाहिजे असं काही नाही, इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे मुंबईतील घाटकोपरमध्ये गुजराती भाषा बोलली जाते, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.

जोशींनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात आली. अशातच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीही जोशींचा तिखट शब्दात समाचार घेतला. दोन मिंद्ये आणि लाचार उपमुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याचा निषेध करायला हवा होता, असंही संजय राऊत म्हणालेत.

'मराठी भाषा ही आमची राजभाषा आहे. त्यामुळे भैय्याजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य राजद्रोह आहे. मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचं भैय्याजी जोशी म्हणालेत. जोशींचं वक्तव्य महायुती सरकारनं कसं सहन केलं? भैय्याजी जोशी हे भाजपचे धोरण ठरवणारे व्यक्ती' असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

'महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. इथे येऊन त्यांनी वक्तव्य करण्याचं धाडस केलंच कसं? मुंबई ही मराठी माणसाची नाही, हा अपमान नाही का? असा संतप्त सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांनी जोशींनी केलेलं वक्तव्य अधिकृत भूमिका आहे का? हे जाहीर करावं. तसे नसेल तर, त्यांनी विधिमंडळात जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करायला हवा, तसा ठराव विधिमंडळात मंजूर करायला हवा', असंही राऊत म्हणालेत.

'बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसाठी आपलं अख्ख आयुष्य पनाला लावले होते. आज त्यांच्या विचारांचे वारसदार गेले कुठे? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आज त्यांच्या विचारांचे वाहक म्हणणारे शांत बसलेले आहेत. त्यांच्यात जर हिम्मत असेल, तर त्यांनी जोंशीच्या वक्तव्याचा निषेध करावा', असे आवाहन संजय राऊत यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT