airplane, Belgaum Nagpur flight start News, Belgaum Nagpur flight News saam tv
महाराष्ट्र

बेळगावहून नागपूरला पाेहचा अवघ्या दीड तासांत; विमानसेवेस उद्यापासून प्रारंभ

बेळगाव नागपूर विमानसेवेमुळे सांबरा विमानतळावरील फे-या व वर्दळ वाढणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

नागपूर : उडान-३ अंतर्गत बेळगावसाठी (belgaum) मंजूर झालेल्या बेळगाव-नागपूर (belgaum nagpur flight) विमानसेवेस उद्यापासून (शनिवार ता.१६ एप्रिल) प्रारंभ हाेत आहे. ही सेवा स्टार एअरच्या माध्यमातून देण्यात असून अवघ्या दीड तासांत सांबरा विमानतळावरुन प्रवाशांना राज्याच्या उपराजधानीत (nagpur) पोहोचता येणार आहे. (Belgaum Nagpur flight latest Marathi news)

सन २०१९ मध्ये बेळगावचा समावेश उडान याेजनेत झाला. त्यानंतर सन २०२० मध्ये बेळगाव-नागपूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला हाेता. दरम्यानच्या काळात काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढला आणि देश लॉकडाऊनच्या छायेत गेला. आता काेविड १९ चे प्रमाण कमी झाल्याने स्टार एअरने विमानसेवा सुरू करण्याची नुकतीच घाेषणा केली आहे.

प्राथमिक माहितीनूसार ही सेवा आठवडय़ातून दोन दिवस असेल. या विमानसेवेचा बेळगाव बराेबर काेल्हापूर (kolhapur), सांगली (sangli) आणि सातारा (satara) जिल्ह्यातील प्रवाशांना फायदेशिर ठरेल असे सांगितलं जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT