Belagavi Home Fire Tragedy News  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Belgaon Home Fire News : बेळगावच्या चव्हाट गल्ली परिसरात मध्यरात्री घराला भीषण आग लागून एकाच कुटुंबातील ४ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडील आणि मुलगा गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • बेळगावच्या चव्हाट गल्लीतील ढोरवाडा येथे मध्यरात्री घराला भीषण आग

  • या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार महिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

  • वडील-मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू

  • शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

रणजित माजगावकर, बेळगाव

गणेश चतुर्थीचा उत्साह आणि आनंद सुरू असतानाच बेळगावमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. चव्हाट गल्ली परिसरातील ढोरवाडा येथे मध्यरात्री एका घराला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार महिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरामध्ये सर्वजण झोपेत असताना अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते. या दुर्घटनेत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांमध्ये शारदा गजानन धमुणे, प्रिया गजानन धमुणे, गंगा गजानन धमुणे आणि भारती राजाराम धमुणे यांचा समावेश आहे. या चौघींच्या मृत्यूने धमुणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गजानन धमुणे आणि रोशन गजानन धमुणे हे दोघे या आगीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरातील गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. काही तासांपूर्वी ज्या परिसरात सणाचा उत्साह होता, त्याच ठिकाणी आता शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे चव्हाट गल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT