स्कूल चले हम..! बीडमध्ये सर्व शाळांना सुरुवात, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद विनोद जिरे
महाराष्ट्र

स्कूल चले हम..! बीडमध्ये सर्व शाळांना सुरुवात, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

बीडमध्ये शाळेचा पहिला दिवस आनंदाचा...

विनोद जिरे

बीड - कोरोनाच्या Corona संकटातून बाहेर येत बीड Beed जिल्ह्यात जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी उत्सुक होते. तर शिकवण्यासाठी शिक्षक देखील आतुर होते. त्यामुळे आज पहिल्या दिवशी शाळेमध्ये School आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तर काही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला. कोरोनाचे नियम पाळून बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या Zilla Parishad 2575 शाळा सुरू झाल्या आहेत.

हे देखील पहा -

ऑनलाइन शिक्षणानंतर आता प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनाचे नियम पाळून विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापन सुरळीतपणे पार पडावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे शिक्षकांनी मत व्यक्त केले. कोरोना काळात प्रदीर्घ कालावधी नंतर शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

मात्र ते भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे ग्रामीण कन्या शाळेचे मुख्याध्यापक जयंत पैठण यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे देऊ असे जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक रसाळ सर यांनी सांगितले.

शिक्षकांना देखील ऑनलाईन शिकवत असताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. प्रत्येक मुलाला ऑनलाईन शिक्षण देता येणे शक्‍य नव्हतं. मात्र आता प्रत्यक्ष शिक्षण देता येत असल्यामुळे विद्यार्थ्याला ज्ञानदानाचे कार्य सुरळीतपणे पार पडणार आहे. असे जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेच्या शिक्षिका स्वाती मेहत्रे यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT