PM Modi Road Show In Nashik Saam Tv
महाराष्ट्र

PM Modi Road Show: लोकसभा निवडणुकीआधी PM मोदींचा नाशिक दौरा, तब्बल दीड किलोमीटरपर्यंत करणार रोड शो

PM Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. १२ ते १६ जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये २७ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Road Show In Nashik:

आगामी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. १२ ते १६ जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये २७ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आलं आहे. याच उद्घाटन १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

या युवा महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनच्या अनावरण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडणार आहे. या अनावरण सोहळ्याला केंद्रीय क्रीडा व सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान मोदींचा रोड शो

नाशिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शोही होणार आहे. नाशिक विभागीय क्रीडा संकुल हेलिपॅड ते मोदी मैदानावरील सभा स्थळापर्यंत मोदींचा रोड शो होणार आहे. तब्बल दीड किलोमीटर मोदींचा हा रोड शो असणार आहे.  (Latest Marathi News)

याचबाबत माहिती देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिनी यंदा नाशिकला हा बहुमान मिळाला आहे. यासाठी देशातील ८ हजार युवक नाशिकमध्ये येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उद्घाटनाला येतील. ही नाशिककरांसाठी एक पर्वणीच आहे. सभास्थळापर्यंत मोदींचा रोड शो होईल. हजारो, लाखो युवा, युवती यांची हजेरी राहील. रेकॉर्डब्रेक अशी सभा होईल.

ते म्हणाले, १२ जानेवारी रोजी मोदी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत, ते कार्यक्रम चुकवत नाही. याचा आणि लोकसभा निवडणुकीचा काही संबंध, असं ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT