Beed Latest News  Saam tv
महाराष्ट्र

Beed Shocking : चाललंय काय? मंदिरातच तरुणाला बेदम मारहाण, बीडमधील आणखी एक धक्कदायक प्रकार, VIDEO

Beed Crime news : बीडमध्ये एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका गटाने तरुणाला मारहाण केली. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबता थांबेना अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बीड तालुक्यातील आहेर वडगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील आहेर वडगावात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आहेर वडगावात मंदिरातच तरुणाला मारहाण झाली आहे. तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तरुणाला मारहाण करण्याचा प्रकार हा २७ मे रोजी घडला. मात्र, त्या दिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मारहाण झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

बीडमध्ये मारहाण झालेल्या या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भीमा राजाराम रोहिटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात आशाबाई राजाराम रोहिटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ दिसत आहे की, बीडच्या आहेर वडगावमध्ये तरुणाला मंदिरातच मारहाण करत असल्याचे दिसत आहे. गावातील काही लोक या तरुणाला मारहाण करत आहेत. काठीलाठीने या तरुणाला मारहाण केली जात आहे. काही लोक तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गावातील लोक तरुणाला का मारहाण करत आहे, याची कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, तरुणाला मारहाणीच्या घटनेने बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT