Beed Saam
महाराष्ट्र

Beed: बीडमध्ये चाललंय काय? महिलेने अंगावर ओतलं डिझेल, अन्...; पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Woman self-immolation attempt Beed: बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका महिलेनं पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांमुळे अनर्थ टळला.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड प्रामुख्याने गुंडगिरीचा हॉटस्पॉट बनला. देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक गुन्हेगाराच्या घटना घडल्या. बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर डिझेल ओतून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? नेमकं कारण काय? पाहा.

नेमकं प्रकरण काय?

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मुलीच्या आईने अंबाजोगाई ग्रामिण पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला पालकांना पोलिसांनी दिला.

अल्पवयीन मुलीच्या पालकांनी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. एक महिना उलटला. तरी देखील अल्पवयीन मुलगी सापडली नसल्यामुळे मुलीच्या आईला संताप अनावर झाला. संतप्त झालेल्या महिलेने पोलीस ठाण्याबाहेर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी धाव घेतली. महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, पुढील प्रक्रिया केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT