Beed Saam Tv News
महाराष्ट्र

Beed News: बीडमध्ये गुंडाराज सुरूच, लाथा-बुक्क्यांनी अन् रॉडनं मारहाण; रूग्णालयातही गुंडांची दहशत

Beed Witnesses Rising Violence: बीडमधील तीन व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओत गुंडांनी कशा पद्धतीनं हैदोस माजवला आहे, हे दिसून येत आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे फक्त बीड नाही तर, राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, तरीही बीडमध्ये गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. बीडमधील तीन व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओत गुंडांनी कशा पद्धतीनं हैदोस माजवला आहे, हे दिसून येत आहे. सध्या हे तिन्ही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

बीड सध्या गुन्हेगारांचं हॉटस्पॉट बनलं आहे. कधी हवेत गोळीबार, कधी हत्या, तर कधी गुंडांची हैदोस असे अनेक प्रकार समोर येत आहे. अशातच बीडमधून मारहाणीच्या आणखी ३ घटना समोर आल्या आहेत. एका व्हिडिओमध्ये एकानं घरात घुसून अमानूष मारहाण करण्यात आली असल्याची माहिती आहे.

तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये जिल्हा रूग्णालयातील सुरक्षारक्षकांकडून एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर, तिसऱ्या घटनेत गावातीलच एका तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या तिन्ही घटनांमुळे बीड पुन्हा हादरलं आहे.

३ मार्चला रात्रीच्या सुमारास टोळक्यांनी पेठ बीड पोलिसांच्या हद्दीत हैदोस घातला होता. एकाच्या घरात घुसून अमानुष मारहाण केली. या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसरी घटना बीडच्या जिल्हा रुग्णालयात घडली आहे. २३ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास एक भोळसर व्यक्ती जिल्ह्या रुग्णालयात आला होता. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला काठीनं अमानुष मारहाण केली असल्याचं सीसीटीव्ही व्हिडिओतून समोर आलंय.

तिसरी घटना पाटोदा तालुक्यातील रोहतवाडीमध्ये घडलीय. पाटोदा येथील मार्केट कमिटीचे उपसभापती तथा भाजपचे पदाधिकारी पांडुरंग नागरगोजे यांच्याच अन्य दोन साथीदारांनी गावातीलच एका तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ कॅमेरात कैद करण्यात आलाय. सध्या तिन्ही घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, बीडमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही घटनेत अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटलांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

Thursday Horoscope : गुरुवारी या 4 राशींचं नशीब चमकणार! पैशांसह करिअरमध्येही मिळणार मोठी खुशखबर; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT