beed crime Saam
महाराष्ट्र

Beed: 'दादा कराडला तू का बोललास? माफी माग' मुंडे टोळीने आणखी एकाला बेल्टनं झोडलं? VIDEO व्हायरल

Youth Brutally Beaten in Front of Camera: दिवटे प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपींचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर. या व्हिडिओत मुंडे टोळी योगीराज गित्ते या युवकाला बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे.

Bhagyashree Kamble

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र आहे. परळीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. मारहाणीदरम्यान आरोपी "याचा संतोष देशमुख पार्ट-२ करायचा आहे" असे बोलत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपी आदित्य गित्ते आणि सचिन मुंडे यांनी नंदगौळ येथील युवकाला बेदम मारहाण केली आहे.

या नव्या व्हिडिओमध्ये त्यांनी "वाल्मिक कराडचा मुलगा दादा कराडला तू का बोललास, त्याची माफी माग" असे म्हणत नंदगौळ येथील योगीराज गित्ते या युवकाला याच टोळीने मारहाण केली. विशेष म्हणजे, या प्रकरणातही पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही. योगीराज गित्ते यांनी आरोप केला आहे की, वाल्मिक कराड याच्या अल्पवयीन मुलाने पोलीस स्टेशनला फोन करून तक्रार न घेण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणात सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, आदित्य गित्ते, तुकाराम ऊर्फ ऋषिकेश गिरी तसेच दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाच आरोपींना २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दिवटे प्रकरणात मुख्य आरोपी असलेले आदित्य गित्ते आणि सचिन मुंडे हेच योगीराज गित्ते यांच्या मारहाणीतील आरोपी असून, या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत? याचा तपास सुरू आहे. आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या घटनेनंतर बीड पुन्हा एकदा हादरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT