Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

Beed Police: बीडमध्ये २५ वर्षीय तरुणाने संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. राहत्या घरी त्याने गळफास लावून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये एका तरुणाने संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. परळी तालुक्यातील दागौळ येथे ही घटना घडली. या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाचा अधिक तपास परळी पोलिस करत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.अनुकंपा तत्त्वावर सेवेत असणाऱ्या या तरुणाला पूर्वी कार्यरत असणाऱ्या केज येथील शैक्षणिक संस्था चालकाने त्रास दिला होता अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद कराडने (२५ वर्षे) त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

श्रीनाथ सध्या आश्रम शाळा, वसंत नगर येथील प्राथमिक शाळेत अनुकंपा तत्त्वावर सेवक म्हणून एक महिन्यापूर्वीच सेवेत रुजू झाला होता. यापूर्वी तो केज येथील एका निवासी शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता. परंतू त्या ठिकाणी १२ वर्षे झाले तरी त्याला संस्थाचालकांनी कायमस्वरूपी करून घेतले नव्हते . यामुळे तो आर्थिक आणि मानसिक त्रासात असल्याचे बोलले जात होते.

केज येथील याच संस्थेत त्याच्या वडिलांनीही शिक्षक म्हणून अनेक वर्षे सेवा दिल्याचे समजते. दरम्यान एक महिन्यापूर्वी तो परळी तालुक्यातील वसंत नगर येथील प्राथमिक आश्रम शाळेत सेवक म्हणून लागला होता. काल त्याने नंदाघोळ येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT