Beed: चोर समजून तिघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: चोर समजून तिघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

बीडच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील घटना ताजी असतानाच, पुन्हा चोरीच्या संशयावरून तिघांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीडच्या Beed पाटोदा Patoda Beed तालुक्यातील पारनेर येथील घटना ताजी असतानाच, पुन्हा चोरीच्या संशयावरून तिघांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र त्या दोन गंभीर जखमींचा अद्यापही शोध लागलेला नाही.

ही घटना केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री गावात सोमवारी रात्री घडली आहे. शिवाजी नामदेव काळे (वय 20) रा. टोकणी ता. इटकूर जि. उस्मानाबाद असं मृत तरुणाचं नाव आहे. तर दीपक अशोक शिंदे व आकाश बापू काळे असं मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

हे देखील पहा-

नेमकं काय घडलं ?

याविषयी मृत तरुणीचे सासरे अशोक भिमराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून, त्यांचा जावई शिवाजी नामदेव काळे, मुलगा दीपक अशोक शिंदे व आकाश बापू काळे हे आरणगावकडून काळेगाव हनुमंत पिंपरीमार्गे त्यांच्या मोटारसायकलने गावाकडे जात होते. त्यादरम्यान, सोमवारी रात्री 12.30 च्या दरम्यान आरणगावच्या पुलावरून पाणी वाहत होत. त्यांनी पुलावरून गाडी घातली. गाडीत पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडली. मात्र, प्रसंगावधान राखून ते गाडीवरून खाली उतरले व ते गाडी ढकलत चालले होते.

चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात;

ते हनुमंत पिंपरी येथे आले असताना चोर समजून जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात शिवाजी नामदेव काळे याचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे जखमी झाले. शिवाजी नामदेव काळे याचा मृत्यू होताच जमावाने त्यांना एका ट्रॅक्टरने बोरगाव चौका रस्त्याच्या कडेला नेऊन टाकून दिले. त्यानंतर जखमी दीपक शिंदे व आकाश काळे हे भीतीने गावाकडे पायी जायला निघाले. मात्र, त्यांचा सकाळपर्यंत तपास लागला नाही. अशी माहिती त्यांनी दिलीय. दरम्यान मयत शिवाजी काळे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात Kej Police Station गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

GK: जगातील सर्वात महागडा चहा कोणता आहे? जाणून घ्या

Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरले; मुलाच्या डोळ्यादेखत भररस्त्यात वाहिलांची हत्या, जुन्या वादातून भयानक कृत्य

Fat burning: फॅट बर्न आणि अँटी-एजिंगसाठी दिवसातून एकदाच जेवण पुरेसं? तज्ज्ञांनी सांगितलं ‘वन मील अ डे’ डाएटचं सिक्रेट

Relationships Tips : जोडीदार सोबत असताना झोप येते, चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांनी काय सांगितले

SCROLL FOR NEXT