#परीक्षांचाधंदाथांबवा: चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे कोट्यावधींचे नुकसान : सुरेश धस SaamTvNews विनोद जिरे
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा: चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे कोट्यावधींचे नुकसान : सुरेश धस

न्यासा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या आरोग्य विभागावर कारवाई करा धस यांची मागणी

विनोद जिरे

बीड : आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आल्यानं भाजप आमदार सुरेश धस यांनी सरकारसह आरोग्य विभागावर सडकून टीका केलीय. गोंधळलेल्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, लाखो विद्यार्थ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची हेळसांड करण्याचे पाप या सरकारने केले आहे.

हे देखील पहा :

अशी सडकून टीका करत, अगोदरच बदनाम असणाऱ्या न्यासा कंपनीला कोणत्या हेतुने आरोग्य खात्याने परीक्षेची जबाबदारी दिली होती. याची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी देखील आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

ते म्हणाले, की आरोग्य विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे गट 'क ' आणि गट 'ड' या पदाच्या परीक्षा रद्द केल्याने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांची हेळसांड झाली आहे. राज्यामध्ये आरोग्य विभागाने जो गोंधळ मांडला आहे. या गोंधळात राज्यातील १५०० परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षेला बसणार होते.

मात्र, या गोंधळलेल्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.यामध्ये विद्यार्थ्यांची हेळसांड करण्याचे पाप या सरकारने केले आहे. असा घणाघाती आरोप भाजपचे आ. सुरेश धस यांनी राज्य सरकार व आरोग्य विभागावर केलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT