Beed Crime
Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

मुकादमाच्या जाचास कंटाळून ऊसतोड मजुराची आत्महत्या

विनोद जिरे

बीड: ऊसतोड मुकादमाच्या जाचास कंटाळून, एका ऊसतोड मजुराने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या (Beed) परळी तालुक्यातील जयगाव (Jaigaon) येथे घडली आहे. भगवान श्रीरंग शिंदे (वय-४०) असे मयत मजुराचे नाव आहे.

बीडच्या माजलगाव (Majalgaon) तालुक्यात असणाऱ्या ढोरगावी येथील ऊसतोड मजूर, भगवान श्रीराम शिंदे आपल्या पत्नीसह गंगाखेड शुगर कारखान्यासाठी (Sugarcane) ऊसतोडणी करत होते. परळी येथील संजय शिंदे हा त्यांच्या टोळीचा मुकादम होता. टोळीवर सतत खटकत असल्याने २ महिन्यापुर्वीच भगवान शिंदे व त्यांची पत्नी गावी (village) वापस आले होते. त्यांच्याकडे फिरलेला हिशोब घेण्यासाठी मुकादम संजय शिंदे, विजयकुमार गडदे, आसाराम शिंदे, गोटू आसाराम शिंदे यांनी त्यांच्या ढोरगावी १० मे रोजी जाऊन भगवान शिंदे यांना फिरलेले पैसे मागितले.

हे देखील पाहा-

यावेळी मजूर भगवान शिंदे यांनी हिशोब करुन ४ दिवसात पैसे देतो असे सांगितले. पंरतु, मुकादम व त्याच्या सहकाऱ्यांनी न ऐकता, थेट ऊसतोड मजूर शिंदे यास मारहाण करत मोटारसायकलवर बसवून, ऊसतोड मजूर शिंदे यांना जयगाव ता.परळी येथील एका शेती आखाड्यावर नेले. आणि त्या ठिकाणी २ दिवस मारहाण करत छळ केला. यास कंटाळून मजूर भगवान शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. २ दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला असून घटना समजताच मयताची पत्नी मुक्ताबाई व नातेवाईक त्या ठिकाणी गेले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार सिरसाळा पोलिसांना (police) सांगितला.

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३६५, ३२३, ३५ भादवी सह ॲट्राॅसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच बीडच्या गेवराई तालुक्यातील, एका मुकादमाने १४ ऊसतोड मजुरांसह त्यांच्या मुलांना उचलीचे पैसे फिरल्याने डांबून ठेवले होते. त्यानंतर ही घटना घडल्याने ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनाला वाटेल तसं मुकादम ऊसतोड मजुरांसोबत वागत आहेत. यामुळे ऊसतोड मजूर नेत्यांनी या मजुराच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT