Beed Solapur Crime Saam
महाराष्ट्र

'माझ्या आयुष्यातून निघून गेला तर..' माजी उपसरपंचाच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा व्हिडिओ व्हायरल

Ex-Deputy Sarpanch Govind Barge: बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या प्रेयसीला बार्शी न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

  • बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळला

  • सुरुवातीला आत्महत्येचा संशय, आता घातपाताचाही तपास

  • पुजा गायकवाडसोबतचे प्रेमसंबंध चर्चेत

  • व्हायरल इन्स्टा रिल आणि सोन्याच्या अंगठ्यांमुळे वाद अधिकच चिघळला

बीडच्या गेवराईतील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बार्शीच्या सासुरे गावात आढळला. सुरूवातीला त्यांनी डोक्यात गोळ्या आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर घटनेच्या विविध बाजू समोर येत आहेत. सोलापुरातील नर्तकेशी असलेले प्रेमलंबंध समोर आल्यानंतर घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे. पूजा गायकवाड हिचा अटक होण्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. पूजा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. गोविंद यांच्या मृत्यूनंतर पूजाचा एक रिल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आठवडाभरापूर्वी तिनं हा रिल शेअर केला होता. या इन्स्टा रिलमध्ये पुजाच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहे.

तसेच तिच्या हातात पाचशेची करकरीत नोट दिसत आहे. रिलमध्ये ती एका डायलॉगची लिप्सिंग करत आहे. 'मला या माणसाची विचित्र सवय लागलीय. माझ्यातून कायमचा गेला तर, माझं फार अवघड होईल', या ऑडिओवर पूजा लिप्सिंग करताना दिसत आहे.

मात्र, या रिल आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? याची चर्चा आता बीडसह सोलापुरात सुरू आहे. गोविंद यांच्या मृत्यूपूर्वी दोघांचे वाद झाले होते. पूजा गेल्या काही दिवसांपासून गोविंद यांच्यासोबत बोलत नव्हती. दरम्यान, या प्रकरणात पूजा गायकवाड सध्या ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. आता पोलीस चौकशीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Setback : शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात जाणार

Success Story: बाईपण भारी देवा! गृहिणी ते डीएसपी; संसारचा गाडा ओढत स्पर्धा परीक्षेत यश; अंजू यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

Jio And Airtel: ₹५०० पेक्षा कमीत रिचार्ज प्लॅन; Jio की Airtel, कोण देतेय जास्त फायदा? वाचा सविस्तर

Shukraditya Rajyog: 9 ऑक्टोबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; शुक्रादित्य राजयोगामुळे मिळणार पैसा

SCROLL FOR NEXT