Beed News  Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडमध्ये गुंडाराज सुरुच; संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून मॅनेजरला मारहाण, VIDEO

sandeep kshirsagar News : संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

बीडमध्ये सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने गरीबाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी एका मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी टाटा शोरुम मॅनेजरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.

बीडमधील राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते सुसाट सुटले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी टाटा शोरूम मॅनेजरला मारहाण केली. क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते सतीश शेळके , गणेश भरणारे, जय मल्हार बागल यांनी टाटा शोरूम मॅनेजरला मारहाण केली. संदीप क्षीरसागर यांचे पीए स्वतः जाऊन टाटा शोरूममध्ये मारहाण करताना दिसत आहे. त्यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शोरुममध्येच मॅनेजरला मारहाण

संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी टाटा शोरुम मॅनेजरला १२ डिसेंबर रोजी मारहाण केली. क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी टाटा शोरुममध्ये जाऊन मॅनेजरला मारहाण केली. दोघे जण संदीप क्षीरसागर यांचे पीए असल्याची माहिती मिळत आहे. तब्बल तीन महिन्यांनी सीसीटीव्ही समोर आलाय.

बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण, सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले प्रकरणानंतर आता संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकत्यांनी मॅनेजरला मारहाण केली. संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते, पीए सतीश शेळके यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एकाला मारहाण केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Mahad Tourism : धबधबे, धुके अन् डोंगररांगा; हिवाळ्यातील नंदनवन, 'येथे' ट्रेकिंग करताना मिळेल अविस्मरणीय अनुभव

Mardaani 3 : 'मर्दानी 3'साठी राणी मुखर्जीने घेतलं तगडं मानधन, 'या' अभिनेत्रीला मिळाली सर्वात कमी फी

पुणे हादरलं! आईनं २ लेकरांसह मृत्यूला कवटाळलं, नवऱ्याच्या त्या कृत्यानं माऊलीने उचलले टोकाचं पाऊल

Stomach acidity symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा पोटातील पित्त वाढतंय; अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी गॅस्ट्रो तज्ज्ञांचा सल्ला

SCROLL FOR NEXT