beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीड आहे की बिहार? भरदिवसा तरुणाला पट्टा आणि काठीने बेदम मारहाण, परिसरात खळबळ

Beed crime news : अंबाजोगईत भरदिवसा तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड जिल्ह्यातील गुंडाची गुंडगिरी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. परळीत टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना अंबाजोगाईत तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली. बीडच्या अंबाजोगाईत भर दिवसा तरुणाला पट्टा आणि काठीने तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलांच्या शाळेतील कामानिमित्त अंबाजोगाई शहरात गेल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता तरुणाला मारहाण झाली आहे. तुझ्या विरोधात कोर्टात केस चालू असताना तू अंबाजोगाईत कसा आला? असे म्हणत तिघांनी पट्टा आणि काठीने बेदम मारहाण केली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता ही मारहाणीची घटना घडली आहे.

अक्षय मस्के असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कमरेचा पट्टा, काठी आणि लाथा बुक्क्यांनी अक्षय मस्के या व्यक्तीला बेदम मारहाण झाली. या मारहानीनंतर जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. अनिल जोगदंड, आकाश बनसोडे आणि चंद्रकांत बनसोडे या तीन आरोपींच्या विरोधात अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळीत टोळक्याकडून बेदम मारहाण

दरम्यान, परळीच्या जलापूर भागात तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. लाठ्या-काठ्या आणि हत्यारांनी ही मारहाण करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमात दोन गटात मारहाण झाली होती. याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाला या मारहाणीमध्ये जबर स्वरूपाची मारहाण झाली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT