Beed Crime news Saam Tv
महाराष्ट्र

बीडमध्ये घरगुती वाद टोकाला; भररस्त्यावर तरूणाच्या डोक्यात कोयता हाणला, मेंदूचा चेंदामेंदा झाला

Beed Domestic Dispute: बीडच्या परळी तालुक्यात घरगुती वादातून तरुणाची निर्घृण हत्या. आरोपी अनिल चव्हाणने कोयत्याने डोक्यावर वार करून भीमराव राठोडचा खून केला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

Bhagyashree Kamble

  • बीडच्या परळी तालुक्यात घरगुती वादातून तरुणाची निर्घृण हत्या.

  • आरोपी अनिल चव्हाणने कोयत्याने डोक्यावर वार करून भीमराव राठोडचा खून केला.

  • हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

  • पोलिसांचा आरोपी शोध सुरू, गुन्हा लवकरच दाखल होणार.

बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच परळीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. घरगुती वादातून एका तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आधी संबंधित विषयावर जोरदार बाचाबाची झाली. नंतर कोयत्यानं तरूणाच्या डोक्यावर वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

भीमराव शिवाजी राठोड असे मृत तरूणाचे नाव आहे. तो बीडच्या परळी तालुक्यातील जळगाव येथील रतन नगर तांडा येथील रहिवासी होता. तर, अनिल बाबासाहेब चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड यांच्यात घरगुती वाद होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू असल्याची माहिती आहे.

अनिल चव्हाण यांनी याच वादातून भीमराव या तरूणाला संपवले असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रतन नगर तांडा जळगाव येथे बोलावून घेतले. त्यांच्यात पुन्हा याच विषयावरून जोरदार शाब्दिक वार झाला. भांडणं टोकाला गेली. त्यानंतर आरोपीनं भीमरावच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले.

या गंभीर हल्ल्यात भीमरावचा जागीच मृत्यू झाला. कोयत्यानं वार केल्यानंतर आरोपी अनिल घटनास्थळावरून फरार झाला. नंतर मृतदेह रस्त्यावर फेकून फरार झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्यावर पडलेल्या तरूणाचा मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

सध्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू असून, मात्र, अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच गुन्हा दाखल करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर बीडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हृदयद्रावक! दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना, विसर्जनाहून परतताना ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

Sanjay Raut At Dasara Melava: या शिवतीर्थाच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ; संजय राऊतांचं महत्वपूर्ण विधान|VIDEO

Badlapur Tourism : शहराच्या धावपळीपासून दूर वसलंय निसर्गरम्य ठिकाण, वीकेंडला बदलापूरला ट्रिप प्लान करा

Ravan Dahan: वरुणाराजाच्या माऱ्यापुढे रावणाची हार; वादळी पावसानं उडवलं मुडकं, तर कुठं रावणनं घेतली झोप| Video

SCROLL FOR NEXT