Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

बीड जिल्ह्यातील कुंबेफळ येथे जुन्या वादातून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

भांडण सोडवल्याचा जुना राग मनात धरून ४ जणांच्या टोळक्याने बीडमधील कुंबेफळ येथील एका तरुणाला आधी बॅटने मारहाण केली. त्यानंतर पाठलाग करून फिर्यादीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना अंबाजोगाई - कारखाना रोडवरील सितारा टॉकीजजवळ घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी बॅटने मारहाण, रात्री तलवारीने वार

कुंबेफळ येथील रहिवासी परमेश्वर बाबुराव शिंपले (वय ३५) यांचा भाचा कल्याण भास्कर दंडवते याला वर्षभरापूर्वी अंबा साखर कारखान्याजवळ काही जणांनी अडवून मारहाण केली होती. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी अशोक मुकुंद मोरे याच्या सातेफळ शिवारातील शेताजवळ कल्याणला पुन्हा मारहाण होत असताना, त्याचा मित्र शशिकांत सुधाकर माने याने मध्यस्थी करून ते भांडण सोडवले होते. याच गोष्टीचा राग आरोपींच्या मनात होता.

याच पूर्ववैमनस्यातून काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आरोपी अशोक मुकुंद मोरे, सैपान उर्फ सोपियान शेख, किशोर उर्फ कृष्णा मुंडे आणि रितेश चव्हाण यांनी कुंबेफळ येथील जयप्रभा शाळेजवळ शशिकांत माने याला गाठून बॅटने बेदम मारहाण केली. जखमी शशिकांतला उपचारासाठी अंबाजोगाई येथे आणण्यात आले होते.

पाठलाग करून जीवघेणा हल्ला

त्यानंतर रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी परमेश्वर शिंपले हे चुलत भाऊ वसंत शिंपले आणि भाचा कल्याण दंडवते यांच्यासह मोटारसायकलवरून अंबाजोगाईवरून गावाकडे परतत होते. त्यांची गाडी अंबा साखर कारखान्याच्या पुलाअलीकडे सितारा टॉकीजजवळ आली असता, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या सैपान शेख, किशोर मुंडे आणि रितेश चव्हाण यांनी "तुम्हाला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत अचानक हल्ला केला.

यावेळी आरोपी रितेश चव्हाण याने जीवे मारण्याच्या उद्देशाने परमेश्वर शिंपले यांच्या डोक्यावर तलवारीने थेट वार केला. हा वार परमेश्वर यांच्या डोक्यात लागल्याने खोल जखम झाली, तसेच तलवार भाचा कल्याण याच्या पाठीलाही लागली. फिर्यादी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तिन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर जखमींनी तातडीने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ नुसार कलम १०९, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

Maharashtra News Live Update:आदिती तटकरे यांनी उडवली महिलांची खिल्ली

Monday Horoscope : संयम ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा उद्याचे राशीभविष्य

Eye Care: सुजलेले डोळे आणि थकवा मिनिटांत पळवा! हा सोपा घरगुती उपाय एकदा ट्राय कराच

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा व्हिडिओ! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT