Sarpanch Santosh Deshmukh Case Accused Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : फरार घुलेला आर्थिक रसद पुरवल्याचा संशय, SIT कडून वकील, डॉक्टरांची कसून चौकशी

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : सरपंच हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपास करण्यात येत आहे. आरोपीला पैसे पुरवल्याच्या संशयामुळे डॉक्टर आणि वकिलाची चौकशी करण्यात आली.

Namdeo Kumbhar

Beed Sarpanch Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला मदत केल्याप्रकरणी एसआयटीने वकील आणि डॉक्टराची कसून चौकशी केली. पैसे पुरवल्याचा त्यांच्यावर एसआयटीला संशय आहे, त्यामुळे चौकशी करण्यात आली. सरपंच हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपास करण्यात येत आहे. वाल्मीक कराड याने सरेंडर केल्यानंतर इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली. याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यासह काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी करण्यात येत आहेत. पण या प्रकऱणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. बीड पोलिसांकडून त्यांना वॉन्टेड घोषित करण्यात आलेय. त्यांचा शोध घेण्यासाठी एसटीआयटी स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीकडून सुदर्शन घुल याच्यासह तिघांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरोपी सुदर्शन घुले याला मदत केल्याप्रकरणी एसआयटीने शुक्रवारी रात्री एका वकील आणि डॉक्टराची कसून चौकशी केली. पैसे पुरवल्याचा त्यांच्यावर एसआयटीला संशय आहे, त्यामुळे चौकशी करण्यात आली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौघांची कसून चौकशी केलीय. यामध्ये डॉ.संभाजी वायबसे व त्याच्या वकील पत्नीसह चौघांचा समावेश आहे. डॉक्टर वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा व पैसे पुरविल्याची चर्चा आहे.

डॉक्टर वायबसे हे ऊसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम पाहतात व एखादा कामगार गायब झाल्यास ते सुदर्शन घुलेची मदत घेत असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान डॉक्टर दांपत्याला नांदेड येथून बीडमध्ये आणत ही चौकशी केली गेली, तसेच इतर दोघांचीही चौकशी या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्यापही फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : रमीच्या डावामुळे माणिकराव कोकाटेंचे खातं जाणार? कुणाला मिळणार कृषिमंत्रीपद?

Aadhaar, PAN Card भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही; कोणत्या कागदपत्राद्वारे सिद्ध होणारं तुमचं नागरित्व? जाणून घ्या

Share Market: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनं आधी गडगडला नंतर सावरला; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये उसळी

Maharashtra Live News Update: - बीडच्या वडवणी शहरात मंत्री इंद्रनील नाईक यांचे जंगी स्वागत

Bitter Gourd: कडू कारले खाण्याचे जबरदस्त आरोग्य फायदे

SCROLL FOR NEXT