Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडमध्ये सरपंचाची गुंडगिरी, महिला- पुरूषांना काळं निळं होईपर्यंत मारलं, दगडफेक करत..

Beed Sarpanch Accused of Brutal Assault: गावातील सरपंच वैजनाथ तांदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तीन महिला आणि दोन पुरुषांवर बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

बीड जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच बीडमधून वंजारवाडी गावातील सरपंचाने केलेल्या गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून तीन महिला आणि दोन पुरूषांना काळं निळं होईपर्यंत मारलं. या हल्ल्यामध्ये ७५ वर्षीय वृद्ध महिलेसह इतर चार जण जखमी झाले असून, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवून घेतलेला नाही.

ही संतापजनक घटना बीड तालुक्यातील आदर्श गावातील वंजारवाडीत घडली. वैजनाथ तांदळे असे संरपंचाचे नाव असून, त्यांचे गावातील एका कुटुंबाशी भांडण झाले होते. पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की, गावातील स्वच्छता मोहिम आणि झाड लागवड उपक्रमात सहभागी न झाल्यामुळे त्यांच्यावर रात्रीच्या वेळी घरावर हल्ला करून मारहाण करण्यात आली.

सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून पीडित कुटुंबाच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच वाहनावर दगडफेक करण्यात आली आणि महिलांवर शारीरिक हल्ला झाला. या मारहाणीत तीन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले. तसेच, ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेलाही मारहाण करण्यात आली आहे.

जखमी कुटुंबीयांनी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केली नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर सरपंच वैजनाथ तांदळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "भांडण झाले हे खरं, मात्र ते झाड लावण्यावरून नव्हे", असा दावा त्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?

Harshad Chopda: 'गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मला चीट...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Maharashtra News Live Update: शेतकरी उपाशी आहेत, विकास करणाऱ्यांचा विमानाने प्रवास - उद्धव ठाकरे

पार्लरमध्ये जाण्याची गरज कशाला? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरीच करा फेशियल; चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो!

Pune : माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT