शेतकऱ्याच्या झोपडीला आग लागून 2 लाख रुपये जळाले; संसारोपयोगी वस्तूंची झाली राख!  SaamTVNews
महाराष्ट्र

शेतकऱ्याच्या झोपडीला आग लागून 2 लाख रुपये जळाले; संसारोपयोगी वस्तूंची झाली राख!

तर आगीत पाच शेळ्यांचा होरपळून मृत्यू

विनोद जिरे

बीड : अचानक शेतकऱ्याच्या झोपडीवरील छपराला आग लागल्याने, २ लाखाच्या रोख रकमेसह संसारपयोगी वस्तूंची जळून राख झालीय. तर पाच शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रात्री साडेअकरा ते 12 च्या दरम्यान बीडच्या आष्टी तालुक्यातील, वाहिरा येथील शेतवस्तीवर घडलीय.

हे देखील पहा :

वाहिरा येथील शेतकरी बापू महमंद शेख हे गावापासून जवळअसलेल्या शेतातील झोपडीवजा एका घरात पत्नी आणि मुलीसह राहतात. सोमवारी रात्री जेवण करून शेख कुटुंब झोपी गेले. रात्री साडे अकरा, बाराच्या दरम्यान अचानक झोपडीच्या छपराला आग लागली.  आग लागल्याचे लक्षात येताच शेख कुटुंबाने प्रसंगावधान राखत लागलीच बाहेर धाव घेतली.

मात्र, काही क्षणात संपूर्ण झोपडी जळून खाक झाली. यात शेख मोहम्मद या शेतकऱ्याने कमावले, नगदी जवळपास 2 लाख रुपयांसह संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तर यावेळी छापरात बांधलेल्या 5 शेळ्यांचा देखील होलपळून मृत्यू झालाय. दरम्यान तात्काळ पंचनामा करून मदत करावी. अशी मागणी उघड्यावर आलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री ICUमधून विषारी धूर येऊ लागला; रूग्णांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला, ८ जणांचा मृत्यू कसा झाला? प्रत्यक्षदर्शीनं दिली माहिती

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची जोरदार तयारी; पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण | VIDEO

Airtel Recharge Offer: एअरटेलचा वार्षिक रिचार्ज प्लॅन; कॉलिंग, डेटासह मिळवा अनेक फायदे, किंमत किती?

Aetashaa Sansgiri : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

Maharashtra Live News Update : वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT