Pankaja Munde Latest Speech  Saam TV
महाराष्ट्र

Pankaja Munde News: 'सहनशीलतेचा अंत पाहू नका; किंमत मोजावी लागेल...' पंकजा मुंडे समर्थकांचा भाजपला इशारा

Beed Politics News: पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई झाल्याने सध्या बीडचे राजकारण चांगलेच तापले आहे.

विनोद जिरे

Beed Political News:

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई झाल्याने सध्या बीडचे राजकारण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून 19 कोटी रुपयासाठी मुंडे साहेबांचा आत्मा असलेल्या कारखान्याला हात लावू नका, 19 कोटी तुमच्या तोंडावर फेकतो... असा आक्रमक पवित्रा घेत भाजपविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

जीएसटी विभागाच्या कारवाईनंतर मुंडे समर्थकांनी दोन दिवसात जवळपास सात कोटी रुपये जमा केले. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ही रक्कम नाकारत, कितीही वाईट वेळ आली तरी आई मुलाच्या ताटातील खात नाही. असं म्हणत भावनिक साद दिली आहे. मात्र तरीही पंकजा मुंडे समर्थकांनी मात्र भाजपवर संताप, नाराजी आणि चिड व्यक्त केली आहे.

राज्यातील 11 पैकी दहा आजारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून मदत केली जाते. मात्र या मदतीच्या यादीमधून वैद्यनाथ (Vaidyanaath Sugar Factory) वगळला जातो. त्यामुळं नेमकं हे षडयंत्र काय ? असा सवाल उपस्थित करत याची आगामी काळात भाजपला किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मुंडे समर्थकांनी दिला आहे.

दरम्यान, जीएसटी चे पैसे भरण्यासाठी ची मोहीम असो की पंकजा मुंडे यांचा 2019 चा पराभव, मागील चार वर्षात पक्षाकडून जी वागणूक दिली यासंदर्भात पंकजा मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजीची लाट आहे.

"2019 च्या पराभवापासून पक्षाकडून पंकजाताई यांना वेगळी वागणूक दिली जात आहे. त्या संदर्भात मुंडे समर्थक जशास तसे उत्तर देतील, असा इशाराही भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रुप पालटणार, १४ कोटींचा विकास आराखडा तयार

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! ११००० पेक्षा जास्त रिक्त पदे; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Balumama Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, बाळूमामांचे मंदिर ३ दिवस राहणार बंद, नेमकं कारण काय?

Panchang Today: आज शुक्ल नवमी, रोहिणी नक्षत्र प्रभावी; वृषभ राशीत चंद्रामुळे चार राशींना मिळणार पैसा

Rashmika-Vijay Wedding : विजय देवरकोंडाच्या आईने सुनबाईंसाठी घातल्या ३ अटी, रश्मिका मंदाना पूर्ण करणार का? लग्नाआधी VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT