MHADA Exam | डमी उमेदवार बसवणाऱ्या आरोपी परीक्षार्थीच्या बीड पोलिसांनी आवळल्या मुसक्या
MHADA Exam | डमी उमेदवार बसवणाऱ्या आरोपी परीक्षार्थीच्या बीड पोलिसांनी आवळल्या मुसक्या विनोद जिरे
महाराष्ट्र

MHADA Exam | डमी उमेदवार बसवणाऱ्या आरोपी परीक्षार्थीच्या बीड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विनोद जिरे

बीड: राज्यात (state) गाजत असणाऱ्या बोगस आरोग्य भरती घोटाळा (Health Recruitment Scam), बोगस टीईटी (TET) प्रमाणपत्र त्याचबरोबर म्हाडा परीक्षा डमी उमेदवार प्रकरणात, बीड (Beed) जिल्ह्यातील आरोपीची संख्या वाढत असतानाचं, आज पुन्हा एका म्हाडा (MHADA) परीक्षेतील आरोपीच्या बीड आणि नागपूर (Nagpur) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.अभिषेक भारत सावंत (वय- 28) रा. आहेर चिंचोली, ह.मु शाहू नगर बीड, असे त्या आरोपीचे नाव आहे. आरोपी (Accused) अभिषेक सावंत याने त्याच्या जाग्यावर डमी उमेदवार बसवला होता. (Beed police nabs accused fielding dummy candidates)

हे देखील पहा-

परीक्षा केंद्रावर परीक्षेस गेल्यानंतर चुकीची स्वाक्षरी केली होती. यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी (police) त्यास पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो फरार झाला होता. त्याच्याकडे अभिषेक सावंतचे पॅन, आधार कार्ड आढळले होते. याप्रकरणी नागपूरचे परिक्षा नियंत्रक दिलीप लामतुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान मध्यरात्री पहाटे ४:३० वाजता शिवाजीनगर पोलीस आणि नागपूर पोलिसांनी त्यास आहेरचिंचोली येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोग्य भरती प्रकरणात अगोदर पकडण्यात आलेल्या, वडझरी पॅटर्नमधील आरोपी, राजेंद्र सानप याच्यासोबत अभिषेक सावंत याचा संपर्क होता. त्यामुळे पुन्हा एकदा वडझरी पॅटर्न चर्चेत आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्यची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Today's Marathi News Live : साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

SCROLL FOR NEXT