Burglars allegedly cut the power supply before breaking into a house and stealing ₹9 lakh cash and gold ornaments in Jawala village of Beed district Saam Tv
महाराष्ट्र

अख्खा गाव अंधारात बुडवला, काळोखातच घरात घुसले; पोपटचा कपाट फोडून ९ लाख, अडीच तोळं सोनं केलं गायब

Burglars Remove Transformer Fuse To Loot House In Beed: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवळाला गावात धाडसी घरफोडी. चोरट्यांनी डीपीचा फ्यूज काढून संपूर्ण गाव अंधारात बुडवला आणि ९ लाखांची रोकड व अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका अंतर्गत जवळाला गावात धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कडी-कोंडा आणि कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाट फोडून तब्बल ९ लाख रुपये रोख रक्कम आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर घरातील कपाट उघडे तर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी गावातील विद्युत डीपीमधील फ्यूज काढून अंधाराचा फायदा घेत घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आजच्या घडीला सोन्याचे दर उच्चांक गाठत असताना, कष्टाने कमावलेली रक्कम आणि भविष्यासाठी साठवलेले दागिने चोरीला गेल्याने कोठुळे कुटुंबीयांवर मोठा आर्थिक आघात झाला आहे. “माझ्या मुलाने ऊसतोडणी करून मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे चोरांनी नेले. आमचे पैसे परत मिळावेत, अशी भावनिक मागणी कुटुंबातील महिलांनी केली आहे.

या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT