Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : मारहाणीनंतर पाय धरायला लावले, बीडच्या शिवराजला मारहाण करणारी पोरं कराड गँगची?

Beed News : शिवराज दिवटे या तरुणाला बीडच्या परळीत मारहाण झाली. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. उरलेल्या ३-४ जणांचा शोध सुरु आहे. या मारेकऱ्यांचे कराड गँगशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

बीडमध्ये काल (१६ मे) शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाली. लाठ्या, काठ्यांसह बेल्टने टोळक्याने शिवराजला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आता प्रकरणातला नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मारेकऱ्यांनी शिवराजला त्यांच्या पाया पडून माफी मागायला लावल्याचे पाहायला मिळते.

बीडच्या मारहाण प्रकरणावर अंजली दमानिया यांनी भाष्य केले. 'बीडमधील परळी गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. याला गंभीरतेने घ्यायला हवे, काल झालेल्या मारहाणीत जे मारेकरी होते, जी मुलं होती; ती लहान होती, अठरा वर्षांच्या आसपासची होती. मुलांनी केलेली मारहाण पाहून, त्या तरुणाला पाया पडायला लावलेलं पाहून असं वाटतं ती मुलं कोणत्यातरी गोष्टीचा बदला घेत होती. हे सगळं कुठेतरी भलत्याच दिशेने जात आहे. ज्याप्रमाणे सीमेवर ऑपरेशन सिंदूर केलं, तसं महाराष्ट्रात बीडमध्ये करायची गरज आहे', असे अंजली दमानिया म्हणाल्या.

शिवराज दिवटेने त्याच्यासोबत काय घडले याची माहिती पोलिसांना दिली. अखंड हरिमान सप्ताहावरुन परतत असताना शिवराजला १०-१५ लोकांच्या टोळक्यांनी गाठले, त्याला रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेऊन मारहाण केली. मारहाण करताना तुझा संतोष देशमुख पार्ट टू करु असे म्हणत होते. याच दरम्यान आसपासचे काहीजण शिवराजच्या मदतीला धावले. त्यांच्यामुळे शिवराज दिवटेचा जीव वाचला.

'मारहाणीदरम्यान काही लोक माझ्या मदतीला आले. टोळक्याच्या तावडीने त्यांनी मला सोडवले. ते जर आले नसते, तर त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते, त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी' असे पीडित शिवराज दिवटे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे, तर तीन-चार जणांचा शोध सुरु आहे. या मारेकऱ्यांचे कराड गँगशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT