walmik karad  Saam tv
महाराष्ट्र

Walmik Karad : वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून जाळपोळ, घोषणाबाजी; दिवसभरात काय काय घडलं?

Walmik Karad News : वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दिवसभरात परळीत ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली. कोर्टाच्या निर्णयानंतर त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी देखील केली. वाचा दिवसभरात नेमकं काय घडलं?

Vishal Gangurde

बीड : बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याच प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची दिवसेंदिवस अडचणीत भर पडू लागली आहे. आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला एसआयटी कोठडी देण्यात आली. वाल्मिक कराडला कोठडी मिळताच त्याच्या समर्थकांनी एकच संताप व्यक्त केला. बीडच्या परळीत कराड समर्थकांनी आक्रमक होत रस्त्यावर जाळपोळ केली.

बीडच्या परळी तालुक्यात संतोष देशमुख प्रकरणामुळे वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच प्रकरणातील आरोपींना विरोधकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. आज कोर्टात हजर केल्यानंतर त्याला वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्याला बीड शहरातील पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं.

दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड समर्थकाकडून आंदोलन करण्यात आलं. परळीच्या कन्हेरवाडीतील रस्त्यावर टायर जाळण्यात आले. वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ कन्हेरवाडी गावाबाहेर परळी-अंबाजोगाई रस्त्यावर हे टायर जाळण्यात आले. तसेच कराड समर्थकांकडून टायर पेटवून घोषणाबाजी देखील करण्यात आली.

कराडच्या समर्थकांकडून परळी बंद

वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठा कडकडीत बंद पाळण्यात आला होता. काल वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर परळी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी देखील केली होती. दरम्यान आज परळी बंदची हाक दिली होती. त्याचेच पडसाद आज दिसून आले.

मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

परळी शहरात कराड समर्थकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. मारोती मुंडे या युवकाचे आंदोलन केले होते. कराड याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी त्याने आंदोलन केले होते. मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा त्याने दिला होता.

कराड समर्थकांचा कोर्ट परिसरात गोंधळ

वाल्मिक कराडला ७ दिवसांची कोठडी दिल्यानंतर त्याच्या समर्थकांनी कोर्टाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. बीड पोलिसांनी कोर्ट परिसरात गोंधळ घालणाऱ्या ५ जणांना ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कराड समर्थकांचा यामध्ये समावेश आहे. तर या सर्व प्रकरानंतर बीड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT