Dhanajay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhanajay Munde News : मुझे गिराने के लिये कई बडे लोग बार बार गिरे...; धनंजय मुंडेंचा शायरीतून नेमका टोला कुणाला?

Rajesh Sonwane

बीड : मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे.. ये मुमकिन नही है.. मला इथेच बांधून ठेवणं, टार्गेट करणे हे आज नाही; तर स्वर्गीय मुंडे साहेब यांच्यापासून अनेक जणांनी प्रयत्न केला आहे. परंतु वाईट एका गोष्टीचं वाटतं कि, जी पातळी एवढ्या मोठ्या नेत्याची आहे. ज्यांचा आजही आम्ही आदर करतो. पण त्या ठिकाणी माझे घर, माझी जात यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका केली; अशा शब्दात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे. 

बीडच्या परळी मतदार संघात खासदार पवार हे विशेष लक्ष घालत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या बोलण्याचा रोख शरद पवारांकडे आहे; अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच आम्ही दादा सोबत राहिलो, परंतु कधीही अशी व्यक्तीगत टीका आम्ही त्यांच्यावर केली नाही. (Parali) परळी वैजनाथ मतदारसंघातील मायबाप जनता अतिशय हुशार आहे. त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केले जात आहे. टार्गेट करायचा प्रयत्न केला तर त्यांचा टार्गेट कसा हाणून पाडायचं? हे सुद्धा परळीकरांना चांगलं माहित असल्याचे मुंडे म्हणाले. 

हरियाणाच्या निवडणुकीचा प्रभाव पडणार नाही 

हरियाणा निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत बोलताना मुंडे यांनी सांगितले, कि हरियाणा येथून खूप दूर आहे. येथे २० किलोमीटरला राजकारण बदलते. ज्या त्या राज्यात राजकारण वेगळे असते. यामुळे त्या निवडणुकीचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मोठी बातमी! सहकारी संस्था निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Black Rose: काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?

VIDEO : रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे; पाहा काय आहे प्रकरण

National Animal: भारताचा वाघ, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी कोणता? पाहून हसायलाच येईल

SCROLL FOR NEXT