Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे २५० कर्मचारी सामूहिक रजेवर; सर्व शाखांचे कामकाज बंद, काय आहे नेमके प्रकरण?

Beed News : बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील शाखा व्यवस्थापक भालेकर हे धर्मापुरी परिसरात असणाऱ्या हॉटेलच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेले होते

विनोद जिरे

बीड : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या परळीच्या धर्मापुरी शाखा व्यवस्थापकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कडक कारवाई करावी ही मागणी घेऊन अधिकारी, कर्मचारी आक्रमक झाले आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी आम्हाला पोलीस संरक्षण द्या. धर्मापूरी शाखा स्थलांतरित करा; अशी मागणी केली असून बँकेचे २५० कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत. 

बीडच्या (Beed) परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील शाखा व्यवस्थापक भालेकर हे धर्मापुरी परिसरात असणाऱ्या हॉटेलच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना हॉटेल मालक फड यांच्यासह अन्य दोघांनी त्यांना जबर मारहाण केली होती. ही घटना १ ऑक्टोबरला घडली होती. कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. मात्र या आरोपीला अटक करायचे सोडून त्याला अटपपूर्व जामीन झाला आहे. त्यामुळे आता (Bank) बँक कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

शाखा व्यवस्थापकाला बोगस कर्जासाठी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. तर यातील मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई न होता, त्यांना अटकपूर्व जामीन झाला आहे. यांच्या निषेधार्थ आणि मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, धर्मापूरी शाखा स्थलांतरित करण्यात यावी, बँक अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. आता बँक अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल २५० बँक कर्मचारी हे सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व शाखा या बंद आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT