Beed News  Saam Tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Beed News : बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला तरी आरोपी फरार आहेत. तपासातील विलंबामुळे मुंडे कुटुंबीय नाराज असून, ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.

Alisha Khedekar

  • परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला.

  • एसआयटी तपासावर मुंडे कुटुंबीय नाराज.

  • मुख्य संशयित गोट्या गीते अद्याप फरार.

  • कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांशी लवकरच महत्त्वाची भेट होणार.

बीड जिल्ह्यातील परळी शहरात व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला बरेच दिवस उलटले आहे. या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. विशेषत: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ठोस कार्यवाहीची मागणी केली होती. मात्र, एक महिना पूर्ण होऊनही तपासाच्या बाबतीत काही ठोस कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे आता मुंडे कुटुंबीय व ज्ञानेश्वरी मुंडे स्वतः जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकात हत्या करण्यात आली. ही घटना घडून बराच कालावधी उलटून गेला आहे. अद्यापही त्यांचा मारेकरी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंडे कुटुंबीयांनी तपासातील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली असून, एसआयटीवर विश्वास कमी होत चालल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित गोट्या गीते अजूनही फरार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला स्पष्ट अल्टिमेटम दिला होता की, जर एका महिन्यात आरोपींना अटक झाली नाही तर बीडसह संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल. त्यामुळे आता परिस्थिती गंभीर व संवेदनशील बनली आहे. जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल आणि ते पुढे कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

परळीतील व्यापारी हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण अजूनही अस्थिर आहे. आंदोलनाचा वादळ पुन्हा उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार आणि सरकार काय पावले उचलणार, यावर पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT