Maratha Reservation Movement Tragedy saam tv
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं, मुंबईत जाता आलं नाही म्हणून टोकाचा निर्णय, बीडमध्ये हळहळ

Maratha Reservation Movement Tragedy: बीडच्या भरत खरसाडे या तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली. मुंबई आंदोलनात सहभागी होण्यासाठी पैसे नसल्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं.

Bhagyashree Kamble

  • बीडच्या भरत खरसाडे या तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली.

  • मुंबई आंदोलनात सहभागी होण्यासाठी पैसे नसल्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं.

  • चार दिवस उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

  • नातेवाईकांचा सरकारकडे सवाल: "आणखी किती बळी घ्यायचे आहेत?"

बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी तरूणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं विषारी औषध पिऊन जीवन संपवलं आहे. तरूणाला मुंबईला जायचे होते. मात्र, खिशात पैसे नसल्याकारणाने त्याला नैराश्य आले. याच नैराश्यातून तरूणानं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भरत खरसाडे असे तरूणाचे नाव आहे. तो बीडच्या आहेरवडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर प्रत्येक मराठा बांधवांनी मुंबईची वाट धरली.

बीडच्या भरत खरसाडे या तरुणालाही मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे होते. मात्र मुंबईला जाण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे आणि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वडिलांकडून त्याला पैसे मिळाले नाही. 'सरकार मुद्दामहून आरक्षण देण्यासाठी चालढकव करीत आहे. मला त्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. मी घरी बसू शकत नाही', असं म्हणत तरूण विषारी औषध प्यायला.

यानंतर तरूण जागीच कोसळला. त्याला तातडीने बीडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेले चार दिवस त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, त्याने प्राण सोडले. मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठा आंदोलनासंबंधित असणाऱ्या प्रत्येक आंदोलनात भरत उत्साहाने सहभाग घ्यायचा. मात्र, चलो मुंबईच्या आंदोलनात त्याला सहभाग होता आलं नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला मुंबई गाठता आली नाही. याच कारणास्तव तरूणानं टोकाचं पाऊल उचललं. 'सरकारला आणखी किती बळी घ्यायचे आहेत?' असा सवाल भरतच्या नातेवाईकांनी विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीचं निधन; वयाच्या ३९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur : अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले; विवंचनेत शेतकऱ्याने आयुष्याचा दोर कापला

Azad Maidan: आझाद मैदान 180 वर्षापूर्वी कसं होतं? हे १० दुर्मिळ फोटो पाहा

Breast cancer recurrence: 20% महिलांना ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याची असते शक्यता; 'या' उपायांनी धोका कमी करता येणं शक्य

Google Pixel 8a वर मिळवा 22000 रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट, आताच खरेदी करा

SCROLL FOR NEXT