Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: खाजगी सावकारकीचा बळी; प्रयोगशाळा सहाय्यकाने पेट्रोल ओतून घेतले जाळून, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

खाजगी सावकारकीचा बळी; प्रयोगशाळा सहाय्यकाने पेट्रोल ओतून घेतले जाळून, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

विनोद जिरे

बीड : सावकारांच्या जाचाला कंटाळून श्‍याम काळे यांनी पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) केज शहरात घडली होती. अखेर श्याम काळे यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली असून १० तासानंतर त्यांचा अखेर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बीडच्या केज पोलीस (Police) ठाण्यात ३ सावकारांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Letest Marathi News)

बीडच्या केजमध्ये खाजगी सावकारकीने प्रयोगशाळा सहाय्यकाचा बळी घेतला. उस्मानाबादच्या कळंब येथील महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक असणाऱ्या श्याम काळे यांनी खाजगी सावकारांकडून १० टक्के व्याजदराने ३ लाख रूपये घेतले होते. या घेतलेल्या ३ लाखात काळे यांचे घर सावकाराने बळजबरीने लिहून घेतले होते. हे घेतलेले घर नावावर करण्यासाठी खाजगी सावकारांनी श्याम काळे काम करत असणाऱ्या महाविद्यालयात जाऊन तेथून गाडीत बसवून रजिस्ट्री करण्यासाठी (Kej) केजला आणलं होतं. मात्र काळे यांनी गाडीतून उतरताच अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले.

स्टॅम्प पेपरद्वारे लिहून घेतले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत श्याम काळे हे परभणीच्या सेलू येथील आहेत. ते सध्या उस्मानाबादच्या कळंब नोकरीला असल्याने कळंब येथेचं स्थायिक झाले आहेत. कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात ते प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करत होते. शाम काळे यांनी एक महिन्यापूर्वी २४ जानेवारीला कळंब येथील खाजगी सावकार दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांच्या यांच्या कडून १० टक्‍के व्याजाने ३ लाख रूपये घेतले होते. त्या पैशाच्या बदल्यात शाम काळे याला ते तिघेजण त्याचे घर त्यांच्या नावावर लिहून दे; अशी मागणी करीत होते. म्हणून मयत शाम यांनी १९ फेब्रुवारीला त्यांना स्टॅम्प पेपरद्वारे स्वतःचे रहाते घर लिहून दिले होते.

जबरदस्‍ती करत नेले रजिस्‍ट्री ऑफीस

या दरम्यान २० फेब्रुवारीला खाजगी सावकार दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांनी त्याला कॉलेजवर जाऊन बळजबरीने त्यांच्या चारचाकी गाडीत बसविले. त्यावेळी शाम हा त्याच्या दुचाकीच्या बाटलीत आणलेले पेट्रोल टाकीत होता. ते अर्धे बाटली भरलेली पेट्रोल त्याच्‍याजवळ असताना बाटलीसह तिघांनी त्याला बळजबरीने गाडीत बसवून ‘आता घराची रजिस्ट्री आमच्या नावाने करून दे’ म्हणून दबाव टाकला आणि शाम काळे याला ते तिघे केजकडे घेऊन आले.

मृत्‍यूपूर्व जबाब नोंदविला

त्यांच्या त्रासाला कंटाळून शाम काळेने केजजवळ आल्यानंतर गाडी थांबताच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. याबाबत केज पोलिसांनी स्वाराती रुग्णालयात जाऊन मृत्यूपूर्व जबाब नोंदवून घेतला होता. जबाब नोंदवून झाल्यानंतर काही तासात शाम काळे यांनी प्राण सोडले. दरम्यान मयत शाम काळे यांच्या मृत्यूपूर्व जबाबावरून केज पोलीस ठाण्यात खाजगी सावकार दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी हा गुन्हा उस्मानाबादच्या कळंब पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT