Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : मनसे सैनिकाचे अनोखे आंदोलन; रस्त्यासाठी थेट रस्त्यावरील खड्ड्यातचं केली अंघोळ

मनसे सैनिकाचे अनोखे आंदोलन; रस्त्यासाठी थेट रस्त्यावरील खड्ड्यातचं केली अंघोळ

विनोद जिरे

बीड : बीडच्या शिरूर कासार शहरातील मुख्य रस्त्यावर साचलेल्या (Beed) खड्ड्यातील गढुळ पाण्यात अंघोळ करून मनसे (MNS) सैनिक सोपान मोरे यांनी अनोखे लक्षवेधी आंदोलन केले आहे. वाजंत्री वाजवत नागरिकांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष आहे. (Live Marathi News)

गत अनेक वर्षांपासून बीडच्या शिरूर (Shirur) शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्डयात पावसाळ्यात पाणी साचत असते. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोपान मोरे यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे. शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या खड्डयाची पूजा करून श्रीफळ फोडून आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर वाजंत्री वाजवून स्थानिक नागरिकांना जागे करत स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ असलेल्या मोठ्या खड्डयाभोवती फुलांची आरास मांडत पूजा केली.

अन्‌ गढूळ पाण्यात केली अंघोळ

यावेळी प्रशासनाच्या निषेधार्ह घोषणा देत साचलेल्या गढूळ पाण्यात मोरे यांनी अंघोळ केली. त्यामुळे आतातरी या नगरपंचायतला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT