Beed 2 Bus Collided  saam tv
महाराष्ट्र

Beed News : परळीत २ बस समोरासमोर धडकल्या, ३० ते ३५ प्रवाशांना किरकोळ दुखापत

बीडमधील परळीत चालकांच्या बेशिस्तपणामुळे दोन बस समोरासमोर धडकल्या.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Beed 2 Bus Collided बीड: बीडमधील परळीमध्ये बस स्टँड परिसरात धक्कादायक घटना घडली. दोन बस समोरासमोर धडकल्या. या अपघातात ३० ते ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या अपघाताला चालकाचा बेशिस्तपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. या बसचालकांवर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे.

बीडमधील (Beed) परळीत बसचालकाचा बेशिस्तपणा समोर आला आहे. बस स्टँड परिसरात दोन बस समोरासमोर धडकून मोठा अपघात झाला. या घटनेत ३० ते ३५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना आज, शनिवारी घडली. (Tajya Batmya)

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने प्रवासी आपापल्या गावी जाण्यासाठी बस स्थानकावर गर्दी करतात. परळीतही प्रवाशांची गर्दी झाली होती. याच बस स्थानकासमोर दोन बस समोरासमोर धडकल्या. (Accident News) चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला.

बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, अपघातानंतर बस स्टँडसमोर बघ्यांची गर्दी जमली होती. यावेळी प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दोन्ही बसच्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT