Accident Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident : ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Beed News : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यातच पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला होता.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातून गेलेल्या धुळे- सोलापूर महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाले. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. 

बीड (Beed) जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर महामार्गावर (Dhule Solapur Highway) अपघाताचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यातच पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात ३ जण ठार झाल्याची घटना बीड बायपासवर घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा धुळे- सोलापूर महामार्गावरील बीडच्या चौसाळा परिसरामध्ये ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला. यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले असून दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. 

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाळासाहेब दिलीप भोसले (वय २६) याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास अन कारवाई सुरू आहे. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT