Teacher Recruitment scam Beed News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिल्या बोगस शिक्षकांच्या ऑर्डर? बीडमधील शिक्षकाचा गंभीर आरोप

Teacher Recruitment scam: तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सहीने थेट मंत्रालयातुन बोगस शिक्षकांच्या ऑर्डर दिल्या गेल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

विनोद जिरे

Beed News: बीडमध्ये इतर मागासवर्गीय विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळेमधील बोगस शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा समोर आला आहे. तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सहीने थेट मंत्रालयातुन बोगस शिक्षकांच्या ऑर्डर दिल्या गेल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या (Beed) पाटोदा तालुक्यात असणाऱ्या वडझरी गावातील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2013 - 14 पासून संच मान्यतेमध्ये 2022 - 23 पर्यंत रिक्त पद नाही. तसेच बिंदू नामावली आरक्षित पद शिल्लक नाही.

तसेच शासन निर्णयानुसार दिनांक 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मात्र तरी देखील पंकज बाबासाहेब सानप यांची 15 जून 2013 पासून नियुक्ती दाखवून सहशिक्षक पदी कायम मान्यता घेतलेली आहे. शासनाच्या तिजोरीला 40 लाख रुपयापेक्षा अधिक गंडा घातलेला आहे.

विशेष म्हणजे ही मान्यता 2022 मध्ये तत्कालीन मंत्री तथा सध्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सहीने दिली आहे. त्याचबरोबर सानप यांचा कोणताही प्रस्ताव हा शासकीय कार्यालयात नाही. असे अनेक आदेश विजय वडट्टीवार यांनी काढलेले असावेत, असा संशय देखील यावेळी सहशिक्षक संजय जायभाये यांनी व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 46 निवासी आश्रम शाळा आहेत,तर राज्यात 977 शाळांची संख्या आहे.. त्यामुळे बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यभर देखील हजारो बोगस शिक्षक भरती केल्याचा संशय देखील यावेळी सहशिक्षक आणि तक्रारदार धनंजय सानप यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार

Sukhada Khandkekar : सुखदा खांडकेकरच्या पायाचं ऑपरेशन, २ महिन्यातच रंगभूमीवर ठेवलं पाऊल

राज्यात आज 'ड्राय डे', मद्यपींचे वांदे होणार! २२ हजार हॉटेल-बार आज बंद, सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडणार

MHADA Lottery 2025: खुशखबर! म्हाडाची तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु, कुठे कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT