Sushma Andhare
Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: भाजपकडून ‘मविआ’मध्‍ये मिठाचा खडा टाकण्याचे काम; सुषमा अंधारेंचा निशाणा

विनोद जिरे

बीड : शिंदे गटाचे बेगडी हिंदुत्व उघडे पडत आहे. राष्ट्रवादी सोबतची अनैसर्गिक युती आता नैसर्गिक कशी झाली? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांचे "अब तेरा क्या होगा कालिया" असं म्हणत सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतलाय. तसेच ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणीवपूर्वक (BJP) भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Beed News) मिठाचा खडा टाकण्याच काम सुरू असल्‍याचे देखील त्‍या म्‍हणाल्‍या. (Live Marathi News)

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या सुषमा अंधारे या माध्यमांशी बोलत होत्या.

अंधारे म्हणाल्या, की वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे. मात्र आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटले आहे. परंतु इतर काही असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ठामपणे ठरवले असून आम्हाला भाजपच्या मुजोरी विरोधात लढणे क्रमप्राप्त असल्याचं अंधारे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT