Pritam Munde Saam tv
महाराष्ट्र

Pritam Munde Statement: उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरीमीरी द्यावी लागते; खासदार प्रीतम मुंडेंचे खळबळजनक वक्तव्य

Beed News: उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरीमीरी द्यावी लागते; खासदार प्रीतम मुंडेंचे खळबळजनक वक्तव्य

विनोद जिरे

बीड : दिव्यांगांना सगळं काही असताना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वर काही म्हणून तहसीलदारांना (Beed) चिरीमिरी द्यावी लागते. असं खळबळजनक वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी जाहीर कार्यक्रमातून केले आहे. (Live Marathi News)

बीडच्या परळी (Parali) शहरात दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिराच्या आयोजित कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे बोलत होत्या. समाज कल्याण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हाभरात सुरू असलेल्या पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर आज परळी उपजिल्हा रुग्णालयात पार पडले आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी समाजातील वंचित उपेक्षितांच्या उत्थानासाठी कार्य केले. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. यंदाही प्रतिष्ठानच्या वतीने गरजू, निराधार आणि दुर्लक्षित घटकांना आधार देणारा उपक्रम राबविला जात आहे. दरम्यान या सर्व दिव्यांग बांधवांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत यामध्ये प्रत्येक तालुक्यात उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळावे अशा सूचना केल्या असल्‍याचे यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT