Beed OBC Morcha Saam tv
महाराष्ट्र

OBC Morcha: ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

Beed News : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका.. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

विनोद जिरे

बीड : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. या मागणीसाठी बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा ओबीसी (OBC) समाज रस्त्यावर उतरून सरकार उलथवून टाकेल; असा इशारा राज्य ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष टी. पी. मुंडे यांनी दिला. तसेच मराठवाड्यामध्ये एकही कुणबी नाही त्यांना प्रमाणपत्र देऊ नका. अशी मागणी देखील त्यांनी केली. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी लढा सुरु असताना राज्य शासन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या विचारात आहे. याला ओबीसी समाजाचा विरोध असून ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी करत समाज रस्त्यावर उतरत आहे. परळीतून ओबीसी जन मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष टी.पी. मुंडे या मोर्चाचं नेतृत्वात परळी ते बीड अशी ९० किलोमीटर कार रॅली काढण्यात आली. 

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाला पुष्प हार घालून या मोर्चाला सुरूवात होवून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा जन आक्रोश मोर्चा धकडला. यावेळी मराठवाड्यामध्ये कुणबी मराठा नाही; मात्र काही अधिकारी मिळून कुणबी प्रमाणपत्र देत आहेत, हे थांबवा अशी मागणी ओबीसी चे नेते प्राध्यापक टीपी मुंडे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT