Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: आंदोलक चढले मोबाईल टॉवरवर; मराठा आरक्षण आंदोलनाला आक्रमक वळण

Beed News : आंदोलक चढले मोबाईल टॉवरवर; मराठा आरक्षणाला आक्रमक वळण

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले असून (Beed) बीडमध्ये देखील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणात सहभागी आंदोलक आज आक्रमक झाले असून मोबाइल टॉवरवर चढून सरकारचा निषेध करत आहेत. (Breaking Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाला सुरवात केली आहे. यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार बीडच्या मादळमोही गावांमध्ये देखील साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. यात समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या साखळी उपोषणादरम्यान ३ आंदोलक (Maratha Aarkshan) तरुण मोबाईल टॉवरवर चढले आहे. गेल्या एक ते दोन तासापासून आंदोलक तरून हे टॉवरवर चढून बसले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर टॉवरवरूनच उडी मारायचा इशारा  

घटनेची माहिती कळताच पोलीस अधिकारी आणि महसूल कर्मचारी देखील टॉवरखाली आहेत. मात्र जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाहीत; तोपर्यंत खाली उतरणार नाही. असा निर्धार आंदोलक मराठा तरुणांनी घेतलाय. दरम्यान जर निर्णय घेतला नाही, तर इथूनच खाली उडी मारणार असल्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT