Health Department In Raid Saam tv
महाराष्ट्र

Health Department In Raid : घरात सुरु होते अनधिकृत गर्भलिंग निदान; धाड टाकत आरोग्य विभागाची कारवाई, महिला ताब्यात

Beed News : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे एका घरात गर्भलिंग निदान चाचणी सुरु असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाने पोलिसांसह धाड टाकली.

विनोद जिरे

बीड : बीडच्या गेवराई शहरात छत्रपती संभाजीनगर रोडवर एका घरात गर्भलिंग निदान करण्याचे (Beed) काम सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. दरम्यान बीड पोलीस (Police) आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी यावर धाड टाकली आहे. यात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे एका घरात गर्भलिंग निदान चाचणी सुरु असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाने (Health Department) पोलिसांसह धाड टाकली. या कारवाई दरम्यान मनीषा पवार या महिलेस पोलिसांनी गर्भ लिंग निदान करत असताना अटक केली आहे. मात्र येथे उपस्थित डॉ. सतीश गवारे हा पळून गेला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जामिनावर पुन्हा केले धाडस 

सदर डॉक्टरने अशाच पद्धतीने गर्भलिंग निदान केले होते. या ठिकाणी गर्भपाताचे औषध, सोनोग्राफी मशीन तसेच इतर साहित्य पोलिसांना मिळून आले आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश साबळे यांनी ही अशीच धाड टाकली होती. या प्रकरणी यातील मनीषा पवार आणि डॉ.सतीश गवरे यांना न्यायालयाने जामीन दिला. त्या नंतर काही दिवसातच या दोघांना पुन्हा एकदा हे कुकर्म करण्यास सुरुवात केली. या बाबत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT