Laxman Hake Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake: ...तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करा, लक्ष्मण हाकेंचे चिथावणीखोर वक्तव्य

Laxman Hake Controversial Statement Majalgaon: बीडमध्ये लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त विधान केले. तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा', असं चिथावणीखोर विधान त्यांनी केले.

Priya More

Summary -

  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केले

  • स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करा, असे चिथावणीखोर विधान त्यांनी केले

  • मेंढपाळांवरील हल्ल्यांवर संताप व्यक्त करताना त्यांनी हे विधान केले

  • अटक न झाल्यास धनगर समाजाकडून आंदोलनाचा इशारा

'जर आपल्यावर कोणी हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा', असं चिथावणीखोर आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. महाराष्ट्रात मेंढपाळांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत संताप व्यक्त करत लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना असं आवाहन केले आहे. बीडच्या माजलगावमध्ये त्यांनी हे विधान केले असून यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, 'राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कोणी जर आपल्यावर हल्ला करत असेल तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीचा वापर करा. मी चिथावणी देत नाही तर जबाबदारीने बोलत आहे.

माजलगाव तालुक्यात मेंढपाळांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी माजलगाव पोलिस ठाण्यात भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या मारहाण प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही, तर धनगर समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बीटे बंधूंचे आजोबा यांनीही आपल्या भावना व्यक्त करत 'आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही',” असे सांगितले. यावेळी लक्ष्मण हाके यांना मारहाणीची घटनेची माहिती देताना बीटेंना अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT