Beed News
Beed News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: हे गाव लयं न्यार! ना लावणी ना डीजे, 'या' गावात बड्डेला फक्त कुस्त्यांचा आखाडा भरणार; आदर्श निर्णयाची सर्वत्र चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जरे..

Beed News: सध्या तरुणाईमध्ये वाढदिवस जोरात साजरा करण्याची मोठी क्रेझ आहे. गावात आपला वाढदिवस दणक्यात साजरा करावा अशी प्रत्येक तरुणाची इच्छा असते. त्यामुळे या वाढदिवसाला कधी लावणी, कधी डान्स तर आता अलिकडे गौतमी पाटीललाच बोलावण्याचा ट्रेंन्ड तयार झाला आहे.

अशातच आता बीडच्या केरूळ गावाने अनोखा निर्धार केला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या गावाने आता कोणाच्याही वाढदिवसाला डीजे, लावणी न लावता फक्त कुस्त्यांचा आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कौतुकास्पद निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

बीडच्या (Beed News) आष्टी तालुक्यातील केरुळ गाव. या गावची लोकसंख्या अडीच हजाराच्या घरात आहे. विशेष म्हणजे या गावात पैलवानाची संख्या जास्त आहे. त्यामुळं जिल्ह्यात या गावची ओळख पैलवानाचे गाव म्हणून आहे. दोन दिवसांपूर्वीचं केरुळ गाव परिसरातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांनी आपल्या बायकोच्या इच्छेखातर बर्थडेच्या कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीचा कार्यक्रम ठेवला होता.

या पैलवानाच्या गावच्या ग्रामस्थांनी बर्थडेसाठी परिसरात होणारे एक ना अनेक प्रकारचे कार्यक्रम पाहून, आता एक अनोखा आणि आदर्शवादी निर्धार केला आहे. अशा कार्यक्रमांना केरुळ ग्रामस्थांनी फाटा दिला आहे.

गावात कोणाचाही बड्डे आसला की बिनकामाचा आवाढावी खर्च न करता कुस्तीचा (Wrestling) आखाडा भरण्याची सुरवात केरुळ गावात झाली आहे. आपल्या गावात बड्डेसाठी ना लावणी,ना डिजे वाजणार. आता फक्त गावातील कोणाच्याही बड्डेला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत, फक्त कुस्तीचा आखाडा भरणार, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT